16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनाशकात कुटुंबातील तिघांची आत्महत्या?

नाशकात कुटुंबातील तिघांची आत्महत्या?

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई-बाप आणि मुलीने आयुष्य संपवले आहे. अख्ख्या कुटुंबाने आयुष्य संपवल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ माजली आहे. आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नाशिक पोलिस याचा तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये तिघांनी आत्महत्या केली. आई, वडील आणि मुलगी तिघांनी आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. विजय माणिक सहाने, ज्ञानेश्वरी विजय सहाने, अनन्या विजय सहाने अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

इंदिरानगर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याचा तपास करत आहेत. परिसरात याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. आत्महत्याच आहे की हत्या.. याचा तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR