24.7 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रनिकालाआधीच मिळणारी मते कशी सांगितली?

निकालाआधीच मिळणारी मते कशी सांगितली?

मुक्ताईनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने त्यांना किती मते मिळणार, याविषयी समाज माध्यमांवर मतप्रदर्शन केले होते. निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच एखाद्या उमेदवाराला आपल्याला किती मते मिळणार, हे त्याला कसे समजू शकते. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी धक्कादायक दावा केला आहे.

दरम्यान,
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांसह विविध नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम मशिनची विश्वासार्हता उपस्थित केली आहे. रोहिणी खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील उमेदवार होते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सत्तेचा दुरुपयोग झाल्याची चर्चा होती.

निकालाआधीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. त्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराने मला अमुक अमुक मते मिळतील, अशी गॅरंटी व्यक्त केली होती. या यादीतील आकडे आणि निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रांवर झालेले मतदान तंतोतंत कसे जुळले? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीत यंदा धक्कादायक निकाल लागला. सत्ताधारी महायुतीच्या २३० जागा निवडून आल्या. त्यांच्या विरोधात मोठी अपेक्षा असताना आणि जनतेत सत्ताधा-यांविषयी नकारात्मक वातावरण असताना महाविकास आघाडीला अतिशय कमी जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यभर आणि देशभर त्या निकालाचे पडसाद उमटत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR