लातूर : प्रतिनिधी
शासनाकडून राबविण्यातत्न येणा-या नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून लातूर शहरातील हॉटेल शिवनेरी ते कावेरी हॉस्पिटल रस्ता डांबरीकारण करण्याचे काम लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या सुरु आहे. मात्र सदरील काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असून या कामात कसल्याही प्रकारची गुणवत्ता दिसून येत नाही. असे असताना या कामाकडे लातूर शहर मनपा प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव व त्यांच्या सहकार्यांनी प्रत्येक्ष कामाची पाहणी करुन कामाच्या दर्जाची पोलखोल केली.
याबाबत परिसरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामासंदर्भाने माजी मंत्री लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांना माहिती दिली होती. या प्रकारात तात्काळ लक्ष घालून रस्त्याच्या कामाची माहिती घ्यावी व तात्काळ लातूर मनपा प्रशासनाला यासंदर्भाने लेखी स्वरूपात तक्रार करावी, अशा सूचना लातूर शहर जिल्हा काँग्रेचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांना यांना दिल्या होत्या. या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दि. २१ डिसेंबर रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.किरण जाधव यांनी आपल्या सहका-यांसह या रस्त्याची पाहणी केली व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सदरच्या रस्त्यावर पुष्प वाहून या निकृष्ट कामाचा गांधीगिरी मार्गाने आगळावेगळे आंदोलन करीत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला.
तसेच महापालिकेने तात्काळ संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून हे काम चांगल्या प्रतीचे व्हायला हवे अशी मागणी करत मनपा प्रशासनाने जर या बाबतीत तात्काळ दखल घेतली नाही तर येणा-या काळात मनपा प्रशासनाच्या विरोधात यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी दिला आहे. यावेळी असिफ बागवान, प्रवीण सूर्यवंशी, अॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, यशपाल कांबळे, अमित जाधव, अॅड.विजयकुमार गायकवाड, राम गोरड, अॅड. गणेश कांबळे, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे, अविनाश बट्टेवार, युसूफ बाटलीवाला, सिराज शेख, पवनकुमार गायकवाड, फारुख शेख, राजू गवळी, ख्वॉपाशा शेख, संमुख गोविंदपुरकर, पिराजी साठे, नितीन कांबळे, अस्लम चाऊस, तौफिक उजेडे, अमोल गायकवाड, जगदीश तोटाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.