32.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeराष्ट्रीयनिफ्टीचा सर्वकालिक उच्चांक

निफ्टीचा सर्वकालिक उच्चांक

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय शेअर बाजार दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. जागतिक बाजारातून सतत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी सतत हिरव्या रंगात व्यवहार करीत आहेत. बुधवारी बाजारात सलग चौथ्या दिवशी वाढ दिसून आली आणि निफ्टीने सार्वकालिक उच्चांक गाठला. डिसेंबरमध्ये दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी ७ टक्क्यांहून अधिक वाढले. सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी वाढून ७२,११० अंकांवर पोहोचला. याच सुमारास निफ्टी २१,६७३.८० अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. अमेरिकेतील चलनवाढीचा दर घसरल्यानंतर व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा हे बाजार वाढण्याचे कारण आहे.

डॉलरच्या घसरणीमुळे बाजारालाही बळ मिळत आहे. आजच्या (२७ डिसेंबर) व्यापार सत्रात सेन्सेक्सने ५०० हून अधिक अंकांची उसळी घेतली. निफ्टी ५० ने ट्रेडिंग सत्रादरम्यान २१,६०३ अंकांची सर्वकालीन उच्च पातळी गाठली. यापूर्वी २० डिसेंबर रोजी सेन्सेक्सने ७१,९१३ अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ३६१ लाख कोटी रुपये झाले आहे.अमेरिकेत महागाईचा दर कमी होत आहे. यानंतर पुढील वर्षी मार्चच्या सुरुवातीला यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची घोषणा करू शकते, अशी माहिती अपेक्षित आहे. भारतातही याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात, असेही सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR