लातूर : प्रतिनिधी
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजेच निमाच्या महाराष्ट्रभरात २५० पेक्षा जास्त शाखा आहेत. दरवर्षी निमा महाराष्ट्र विविध पुरस्कारांची घोषणा करते. निमा लातूरला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
हे पारितोषिक २०२३-२४ च्या निमा लातुर शाखेने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मिळाले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून निमा लातूरला मेंबरशीप ग्रोथ अवार्ड म्हणजे सदस्य संख्या वाढीसाठीचा प्रथम पुरस्कार ही मिळाला आहे. हे दोन्ही पुरस्कार निमाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख, तत्कालीन सचिव डॉ. महेश सांडूर व उपस्थित सर्व राज्य प्रतिनिधींनी खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपुर, निमा केंद्रिय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, राज्य अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत स्वीकारला. या कार्यक्रमास केंद्रीय कोषाध्यक्ष डॉ. शांतीलाल शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय जोशी, डॉ. निळकंठ सोनटक्के, डॉ. विनोद कोराळे, निमा लातूर अध्यक्ष डॉ. बालाजी सोळुंके, डॉ. माधव किरवले, डॉ. रामचंद्र लखनगिरे इत्यादी उपस्थित होते.