लातूर : प्रतिनिधी
अध्यात्माचे अधिष्ठान ठेवून राजकारण व समाजकारण करणारे कर्मयोगी म्हणून दिलीपराव देशमुख यांनी अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असताना निरपेक्ष भावनेने जन्मभूमी ही जननी मानून जिल्ह्यातील विकासासाठी सहकार, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रात उपक्रम यशस्वी राबवत लोकांना स्वावलंबी आधार देण्याचे काम कुठलीही जात पात धर्म न बघता सर्वांना सहकार्य केले या निगर्वी सर्व समावेशक नेतृत्वाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो, असा आशीर्वाद काशीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामी यांनी दिला.
लातूर येथे धनराज नागलगावे व समाजाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त यथोचित सत्कार कस्तुराई मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिरेमठ संस्थानचे श्री ब्र.ब्र १०८ शांतीविर शिवाचार्य महाराज औसा, माजी आमदार वैजनाथरसाव शिंदे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी महापौर दीपक सुळ, बालाप्रसाद बिदादा, उद्योजक हुकूमचंद कलंत्री, सुधीर गोजमगुंडे, उद्योजक लक्ष्मीनारायण कचोळ्या, उद्योजक अमोलशेठ बच्चेवार, उद्योजक शिवकुमार गुळंगे, उद्योजक, दत्ता शिवणे, उद्योजक आशिषशेठ बच्चेवार, धनराज नागलगावे, मन्मथआप्पा पंचाक्षरी बसवंतआप्पा भरडे, अॅड. गंगाधरअप्पा हामने, भालचंद्रआप्पा मानकरी, बाबुराव वडगावे, अशोक पाटील रमेश सूर्यवंशी प्रभू हालकुडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगद्गुरु डॉ. महास्वामी यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करत साखर उद्योग कसे चालवावे अधिक भाव कसा देता येतो याचा आदर्श राज्यातील साखर उद्योगाला त्यांनी घालून दिला आहे मागच्या ५० वर्षात दिलीपराव देशमुख यांनी जे प्रत्येक समाजातील लोकांना सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाना सहकार्य केले आज लातूर स्वत: च्या जन्मभूमीत जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना राबवून शेतक-यांना आधार देण्याचे काम केले आहे त्याबद्दल कौतुक करत निरोगी आयुष्य लाभो, असा आशीर्वाद दिला.
प्रास्ताविक शांतीविरलिंग शिवाचार्य महाराज यांनी करत हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत भूमिका विषद करत लिंगायत समाजाला माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिलेले योगदान यांची माहिती दिली. यावेळी अॅड. प्रमोद काळे, संतोष देशमुख, दयानंद बिडवे, सचिन दाताळ, अॅड. उमेश पाटील, विजय चीतकोटे, ओमकार पंचाक्षरी, बसवराज मंगरुळे, सुभाष आपा मुक्ता,युवराज हालकुडे, प्रा.संगापा बावगे, भालचंद्र दानाई, शिवकांत स्वामी, सुनील मिटकरी, कमलेश पाटणकर, त्रिंबक स्वामी, संजय हत्ते, जयश्री उटगे, सौ. हवंना, सौ. उपासे, सौ. तोडकरी यांच्यासह मान्यवर उद्योजक, व्यापारी समाजबांधव भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.