22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरनिलंगा तालुक्यात वादळीवा-यासह जोरदार पाऊस, घरावरील पत्रे उडाली, विद्युत पोल, झाडे उन्मळून पडली 

निलंगा तालुक्यात वादळीवा-यासह जोरदार पाऊस, घरावरील पत्रे उडाली, विद्युत पोल, झाडे उन्मळून पडली 

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील विविध गावात शनिवारी सायंकाळी ४ वाजता अचानक आलेल्या चक्री वादळासह पावसात विद्युत पोल, झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. चक्री वादळात जवळपास आर्धा तास नागरिकांनी जीव मुठीत धरून पलंगाच्या खाली अश्रय घेतला.
मागच्या महिना भरापासुन निलंगा तालुक्यातील अनेक गावात वादळी वारे व अवकाळी पाऊस कोसळत असून शनिवारी सायंकाळी ४ वाजता सुटलेल्या चक्री वादळाने  कहरच केला. जवळपास आर्धा तास चक्री वादळसदृश व अवकाळी पावसानेअक्षरश: थैमान घातले. या वादळाचा फटका ग्रामीण भागातील  घरांना बसला. विशेषत: तालुक्यातील उमरगा (हा), हाडगा, राठोडा, वडगाव अदी गावांना बसला.
अनेक सामान्य नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर अनेक ठिकाणी विद्युत पोल कोसळले. उमरगा ते हाडगा रोडलगत असलेल्या मेन लाईनचे पाच पोलच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून जाऊन त्यावरी दगड धोंडे घरात पडून संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले.  अनेकांनी जीव वाचविण्यासाठी घरातील पलंगाच्या खाली बसून आपला जीव वाचवला. वादळ थांबल्यानंतर कोणाच्या घरावरील पत्रे कोठे उडून गेले हे कळत नव्हते. एकंदरीत वादळी वा-यासह अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR