निलंगा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या तूलनेत ५० टक्के पाऊस झाला आहे. परिणामी तालुक्यातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे निलंगा तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे. निलंगा तालुक्यातून वाहणा-या प्रेरणा नदीमध्ये पाणी नसल्याने नदीचे पात्र कोरडे ठाक आहे तर निलंगा तालुक्यातील ११ तलावांमध्ये मृतसाठा आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता दत्तात्रय कोल्हे यांनी एकतमशी बोलताना दिली.
















