17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरनिलंगा मतदारसंघात नेत्यांची घोडदौड सुरू

निलंगा मतदारसंघात नेत्यांची घोडदौड सुरू

निलंगा :  लक्ष्मण पाटील
निलंगा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकरिता भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याकरिता मतदारसंघात विविध हातखंडे वापरत मतदारांच्या भेटीगाठी घेत मतदारांचा कौल आपल्याकडे वळविण्याकरिता नेत्यांची घोडदौड सुरू झाली आहे. सत्ताधा-यासह विरोधकांनी जनसंपर्क करीत मतदारसंघ ंिपजून काढत मतदारांचा संपर्क वाढविल्याने आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागल्याचे चित्र निलंगा विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
         निलंगा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे स्वर्गीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. काँग्रेसच्या या बालेकिल्यास त्यांचे नातू भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सन २००४ ते २०२४ दरम्यान २००९ चा अपवाद वगळता तीन वेळा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरले मात्र त्यांना रोखण्याकरिता विरोधी पक्षातील नेत्यांनी आपली मोट बांधत सभा, गावोगवी कॉर्नर बैठका घेत जनसंपर्कात आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व त्यांचे बंधू अरंिवंद पाटील निलंगेकर हे त्यांच्या कारकिर्दीतील कामाचा लेखाजोखा देत जनसन्मान पदयात्रा, जन संवाद या माध्यमातून मतदारसंघात प्रचार दौरे काढून विविध उद्घाटने करीत जनहितार्थ शासनाने राबविलेल्या योजना व त्यांनी मतदारसंघात केलेले काम बैठका व सभेतून जनतेसमोर मांडत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातून गेलेला मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणण्याकरिता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व सौ संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर हे जनसंवाद अभियान दौरे व महिला मेळावे घेत स्वर्गीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघाच्या विकासाकरिता केलेल्या कार्याची माहिती देत आम्हीच दादासाहेबांचे खरे वारस आहोत असे सांगत जनसंपर्क वाढविला आहे तर काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके हे मतदारसंघातील निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या राष्ट्रीय महामार्गाची परीक्रमा काढून गणेश दर्शन , गावागावात कॉर्नर बैठका, जिल्हा परिषद गटनिहाय सभा घेत मतदारसंघ ंिपजून काढत आहेत. या जनसंपर्क अभियानातून शासनाने केलेली जनतेची दिशाभूल व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मतदारसंघाच्या विकासाकरिता झालेले दुर्लक्ष व काँग्रेसची विचारधारा जनतेसमोर मांडत मतदारसंघ काँग्रेसमय करण्यात आघाडी घेतली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक बगदुरे हे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार तीन वेळा पडल्याने हा महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात निलंगा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करून तिकिटाची मागणी करीत मतदारसंघातील मतदारांच्या भेटी गाठी घेत दौरे करीत मतदारसंघातील मतदारांचा संपर्क वाढवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR