19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरनिलंगा विधानसभा मतदारसंघात भगवा भडकवणार 

निलंगा विधानसभा मतदारसंघात भगवा भडकवणार 

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्यास येणा-या विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्वांच्या साथीने निलंगा विधानसभा मतदारसंघात भगवा भडकवणार, असे प्रतिपादन, (उबाठा) शिवसेना नेत्या डॉ.शोभाताई बेंजरगे यांनी व्यक्त केला.
    शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह निमित्त शिरूर अनंतपाळ येथे गुरूवारी आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. या प्रसंगी लातूर लोकसभा निरिक्षक माजी.  आ. सुनिल प्रभु, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर, जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हा सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, निलंगा विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल वेंगुर्लेकर, जिल्हिा प्रमुख माजी आ. दिनकरराव माने,जिल्हा समन्वयक पप्पू कुलकर्णी, जिल्हा समन्वयक शि. के मुरळीकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ जयश्रीताई उटगे, युवा नेते अविनाश रेशमे, तालुका प्रमुख तथा आनंदवाडी सरपंच भागवत वंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  या मेळाव्यासाठी जिल्हा प्रमुख माजी आ.दिनकर माने यांनी मार्गदर्शन करताना निलंगा विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामास लागावे असे आवाहन करत कार्यकर्त्यांनी गावो गावी जाऊन शिवसेनेची सदस्य नोंदणी व बुथ प्रमुख सक्षम करावे असे, आवाहन केले.  शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, संपर्क प्रमुख रोहीदास चव्हाण, निलंगा विधानसभा प्रमुख सुनिल वेंगुर्लेकर, जिल्हा समन्वयक पप्पू कुलकर्णी, निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केले. मेळाव्यात निवृत्त मंडळ अधिकारी संजय कुलकर्णी, रापकाचे उपसरपंच उत्तम माने,अंतेश्वर शिरसे यांनी शिवसेनेत जिल्हा प्रमुख दिनकर माने यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.
सुत्रसंचलन रमेश सोनवणे यांनी तर आभार भागवत वंगे यांनी मानले.यावेळी निलंगा विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी,युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल मातोळकर, जिल्हा शहर प्रमुख बालाजी जाधव, महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक सुनिल बसपुरे, निलंगा महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखा पुजारी, उपजिल्हा संघटिका सरोजा गायकवाड, नगरसेवक रागिणी शिवणे, शहर प्रमुख सतीश शिवणे, शहर संघटक गोंिवंद श्रीमंगल, तालुका समन्वयक दशरथ जगताप, सहसंपर्कप्रमुख निवृती सुर्यवंशी, परमेश्वर कामगुंडा, पप्पू शिवणे, मारोती गव्हाणे, अभिनंदन दुरूगकर, मन्मथ तांदळे, आनंद इंदलकर यांसह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक, शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR