20.7 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरनिलंगा शहरासह तालुक्यात जल्लोष

निलंगा शहरासह तालुक्यात जल्लोष

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचे नाव घोषित होताच निलंगा शहरासह तालुक्यातील गावागावात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांनी चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. अभय साळुंके यांचे निलंगा शहरात आगमन होताच जंगी स्वागत करून शहरात वाजत गाजत रॅली काढण्यात आली. साळुंके यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
        निलंगा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांची उमेदवारी घोषित होताच निलंगा शहरात व पनंिचंचोली येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर औराद शहाजानी, तगरखेडा, हलगरा, सावरी, हलशी आदीसह गावागावात चौकाचौकात आतिषबाजी करीत घोषणाबाजी देत जल्लोष साजरा करण्यात आला. त्यांचे पानंिचंचोली गावात व निलंगा शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. तदनंतर निलंगा शहरातून काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून शहरात वाजत गाजत फटाक्यांची आतशबाजी करून रॅली काढण्यात आली.
यावेळी अभय साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर स्वर्गीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पिरपाशा दर्गा व दादापिरदर्गा व ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले.  अभय साळुंके यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुणे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज शेळके, चेअरमन गंगाधर चव्हाण, शहराध्यक्ष अजित नायकवडे, नारायण सोमवंशी, विकास पाटील, शकील  पटेल ,सुतेज माने, रमेश मदरसे, विठ्ठल पाटील, अबरार देशमुख, धनराज टेकाळे, माधव बेंजर्गे, बाळासाहेब पाटील, मलबा घोणसे, दिनकर बिरादार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार, गिरीश पात्रे, तुराब बागवान, उपसरपंच महेश भंडारे, हाजी सराफ, बालाजी भंडारे, औराद शहराध्यक्ष पद्मंिसह पाटील, रवी गायकवाड, बक्सू मुल्ला, विलास कांबळे आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे चाहते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR