निलंगा : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गृहमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करीत प्रतिमा दहन करून आंदोलन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत असून अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तात्काळ गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यातआली. यावेळी मोहन सूर्यवंशी, देवदत्त सूर्यवंशी, वामन कांबळे, सुमित सायगल, चंद्रकांत सूर्यवंशी, संतोष कांबळे, साहेबराव कांबळे, अखिलेश कांबळे, सूरज कांबळे, संघर्ष कांबळे, अमर सुतके, महेश कांबळे, प्रशांत गायकवाड, बंटी कांबळे, लखन कांबळे, विलास कांबळे, संदीप कांबळे, ईश्वर सूर्यवंशी, बलभीम सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, दुदाजी कांबळे, विकी कांबळे, मॉन्टी कांबळे, बबलू कांबळे, सोनू कांबळे, माधव कांबळे, राज वाघमारे, उमाकांत कांबळे, राहूल कांबळे, आदेश सूर्यवंशी, समाधान कांबळे, इम्रान शेख अदींची उपस्थिती होती.