निलंगा/ शि. अनंतपाळ : प्रतिनिधी
मागच्या आडीच वर्षाच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खूनशी राजकारण करीत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचे घर फोडून अजित पवार यांना सोबत घेतले. दोन्ही पक्षाची मालकी दुस-यांना देऊन आम्हच्या हातात सत्ता आहे आम्ही काहीही करु शकतो असे वातावरण निर्माण करुन घटनेची पायमल्ली केली. या अन्यायाचा बदला घेण्याकरिता महाराष्ट्रातील जनता सज्ज झाली आहे. अभय साळुंके यांच्या सारख्या संघर्षातून तयार झालेल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवून परीवर्तन घडवा, असे आवाहन खासदर डॉ. शिवाजीराव काळगे यांनी दिला.
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ साकोळ ता शिरूर अनंतपाळ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार अभय साळुंके,अॅड संभाजीराव पाटील शिरूरअनंतपाळ, तालुकाअध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, माजी सभापती अजित माने, आंबादास जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, भागवत वंगे, सुतेज माने, बाळासाहेब पाटील, प्रमोद भदरगे हे उपस्थित होते. यावेळी नागरिक उपस्थित होते.