27.8 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeमहाराष्ट्रनिलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती

निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती

लता, करिष्माचे मोबाईल तिजोरीत सापडले

प्रतिनिधी
रविवारी, ३१ मे रोजी निलेश चव्हाणच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. यावेळी वैष्णवीची सासू लता आणि तिच्या नणंद करिष्माचा मोबाईल निलेश चव्हाणच्या तिजोरीत सापडला आहे. त्यामुळे आता वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यातील हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा सासरा राजेंद्र हगवणे (अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी), सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद करिष्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात १० दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ३० मे रोजी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली होती. यानंतर ३१ मे रोजी निलेश चव्हाणच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. यावेळी वैष्णवीची सासू लता आणि तिच्या नणंद करिष्माचा मोबाईल निलेश चव्हाणच्या तिजोरीत सापडला आहे. त्यामुळे आता वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे. तो हगवणे कुटुंबाच्या वादात नेहमी मध्यस्थी करायचा अशी माहिती समोर येत आहे. तसेच वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ निलेश चव्हाणकडे देण्यात आले होते. वैष्णवीच्या माहेरच्यांना म्हणजेच कस्पटे कुटुंबीयांना याबाबत जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा ते निलेश चव्हाणकडे वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेले होते. पण निलेश चव्हाणने कस्पटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी निलेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच निलेशने वैष्णवीचे बाळ दुस-या व्यक्तीकडे देऊन तो २१ मेपासून फरार झाला होता. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी अटक केल्यानंतर निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR