32.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeलातूरनिवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यासाठी आलोय 

निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यासाठी आलोय 

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर माझी भेट हरंगुळ बु. गावाला आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आज मी येथे आलो आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हरंगुळ बु. येथील नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. हरंगुळ बु. च्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २९ एप्रिल रोजी दुपारी लातूर शहराजवळील हरंगुळ (बु), वरवंटी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आल. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, लातूर कृषी उत्पन्न  बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेन्टी-वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संचालक शाम बरुरे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, मजीप्रा शाखा अभियंता दत्तात्रय पाचगे, उपअभियंता उषा मोतीपवळे, शाखा अभियंता प्रिया पाटील, धनराज पाटील, संचालक हणमंत पवार, आनंद पवार, सुर्यकांत पाटील, रामचंद्र सुडे, सुर्यकांत सुडे, सरपंच शितल झुजारे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि वरवंटी गावचे, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्यातून सदरील कामे मंजूर करण्यात आली असून ही कामे अत्यंत जलद गतीने आणि दर्जा राखून पूर्ण करावीत. अशा सूचना या प्रसंगीत दिल्या. निवडणूक काळात जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपण बांधील असून येत्या काही महिन्यात संपूर्ण आश्वासनांची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाहीही याप्रसंगी त्यांनी दिली.
गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे, पुढेही निधी उपलब्ध करुन देऊ. हरंगुळ हे नाविन्यपूर्ण गाव आहे. पाणंद रस्त्याला सध्या शासनाने स्थगिती दिली आहे, ती स्थगिती उठली की पाणंद रस्त्याला मंजुरी देऊ. आऊटर रिंग रोडचे सर्वेक्षण लवकरच सुरु होईल. हरंगुळ ते आकारवाई शिवरस्ता होईल. रस्त्याच्या नियमानुसार तो रस्ता टिकला पाहिजे.
लातूर शहरातील वरवटी रोड ते हरंगुळ येथे शिवरस्ता १.५ कि. मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत ४० लाख रुपये विकास निधी मंजूर  झाला आहे. या १.५ किलोमीटर लांबीच्या शिवरस्ताचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण या निधीतून करण्यात येणार आहे, हा प्रकल्प ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत पूर्ण केला जाणार आहे. तर मौजे वरंवटी ता. जि. लातूर येथे स्थानीक आमदार विकासनीधीतून १० लाख रुपये निधीतून परशुराम पार्क समोरील रस्ता हरंगुळ रोड पर्यंत सिमेंट काँक्रीट करण्यात येणार आहे. तसेच मौजे वरंवटी येथील जिजाऊ नगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामसाठी स्थानीक आमदार विकासनीधीतून १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, या सर्व विकासकामांचे भूमीपूजन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हरंगुळ बु. येथे सरपंच शितलताई भीमाशंकर झुंजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बिराजदार, मंडळ अधिकारी नागनाथ खंदाडे, तलाठी तानाजी जाधव, ग्रामसेवक वी. व्ही. पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता दत्तात्रय पाचंगे, परमेश्वर वाघमारे, राजाभाऊ वाघमारे, भीमाशंकर झुंजारे, शाम बोरुडे, आनंद पवार, सूर्यकांत पाटील, श्रीरामचंद्र सुळे, सुरेखा धुळे, बाबुराव शेळके, रामभाऊ सागर, हणमंत पवार, गणेश पाटील, वीरभद्र झुंजारे, रामभाऊ मगर तर वरवंटी येथे सरपंच पवन जाधव, प्रा. लता बावणे आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हरंगुळ व वरवंटी येथील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR