जळगाव : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील किनगावजवळ झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर कार्य करण्यासाठी जाणा-या शासकीय कर्मचारी महिलांचे वाहन अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात चार शिक्षिका व कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.
जखमी महिलांना उपचारासाठी चोपडा येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. किनगाव (तालुका यावल) येथील कृषि उत्पन्न बाजारच्या उपकार्यालयासमोर सोमवार (दि. १८) रोजी ज्योती भादले, मीनाक्षी सुलताने, आडगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक कार्यरत असलेल्या कविता बाविस्कर व शिक्षिका लतिका परवीन तडवी या चोपडा येथे निवडणूक कर्तव्यावर रवाना झाल्या.
चोपड्याकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय कामावर जाताना मंगळवार (दि. १९)सकाळी ७ वाजेच्या सुमारास वाहनचालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी अनियंत्रित झाल्याने अपघात घडला.