28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त माहिती अपलोड

निवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त माहिती अपलोड

राजकीय पक्षांनी केली होती माहिती सादर निवडणूक आयोगाची तत्परता

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज रविवारी निवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त डेटा अपलोड केला, यात रिडीम केलेल्या रकमेवरील पक्षनिहाय तपशील तसेच बँक खात्याच्या माहितीचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून ही माहिती नुकतीच डिजीटल स्वरूपात निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे.

१२ एप्रिल २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार राजकीय पक्षांनी सीलबंद कव्हरमध्ये निवडणूक रोख्यांवर डेटा दाखल केला होता. राजकीय पक्षांकडून मिळालेला डेटा सीलबंद कव्हर न उघडता एससीमध्ये जमा करण्यात आला. राजकीय पक्षांनी दिलेल्या माहितीमध्ये इलेक्टोरल बाँड्सद्वारे पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा तपशील, प्रत्येक बाँडच्या रकमेचा संपूर्ण तपशील, प्रत्येक बाँडवर मिळालेल्या क्रेडिटचे संपूर्ण तपशील यासह ज्या बँक खात्यातून रक्कम जमा झाली आहे. प्रत्येक क्रेडिटच्याटच्या तारखेसह जमा झाल्याची माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १५ मार्च २०२४ च्या आदेशानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सीलबंद कव्हरमध्ये पेन ड्राइव्हमध्ये त्याच्या डिजिटलीकृत रेकॉर्डसह प्रती परत केल्या. यापूर्वी, १५ फेब्रुवारी आणि ११ मार्च २०२४ च्या आदेशात समाविष्ट असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी, ईसीआयने स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रदान केल्यानुसार निवडणूक रोख्यांवर डेटा अपलोड केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR