22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरनिषेधार्थ निलंगा कडकडीत बंद

निषेधार्थ निलंगा कडकडीत बंद

निलंगा : प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील वलांडी येथे ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दि ३१ जानेवारी रोजी निलंगा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सकल ंिहंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला तर सायंकाळी शहरात कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला.
     निलंगा शहरात सकाळपासूनच कडकडीत बंदी असल्याने शहरातील विविध व्यापारपेठ ठप्प झाली होती. सकल ंिहदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत त्या  नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्या व कारवाई करा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने केली आहे. सकल ंिहंदू समाजाच्या वतीने सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा स्मारका पर्यंत कॅन्डल मार्चा काढून जाहीर निषेध नोंदविण्यात आला . दरम्यान शहरातील दवाखाने, मेडिकल या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन घटनेचा निषेध करण्यात आला .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR