लातूर : नीट परीक्षेची तयारी करीत असलेल्या एका विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नीट परीक्षेची तयारी करणा-या वीस वर्षीय अनिकेत अंकुश कानगुडे या विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मागच्या वेळी अनिकेतला ५२० च्या जवळपास गुण मिळाले होते. त्यानंतरही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळावा, यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. अनिकेत हा मूळचा बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा गावचा रहिवासी आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेची नोंद शिवाजी नगर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.