25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरनीट प्रकरणातील दुस-या आरोपीस २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

नीट प्रकरणातील दुस-या आरोपीस २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

लातूर : प्रतिनिधी
संबंध देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव यास २ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नीट परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण लातूरपर्यंत पोहचले. लातूर येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परीक्षा पेपर फुटी प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सुरुवातीस जलील उमरखाँ पठाण, कातपूर जि. प. प्रशाला शिक्षक यास न्यायालयाने काल २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल दुपारनंतर या प्रकरणातील दुसरा आरोपी जो चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील रहिवाशी आहे व सोलापूर जिल्ह्यातील टाकळी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहे. यास अटक करण्यात आली होती. आज त्याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने जाधव यास देखील २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात लातूर पोलिसांनी जलील उमरखाँ पठाण, संजय तुकाराम जाधव, ईरण्णा मष्णाजी कोंगलवार (आयटीआय शिक्षक उमरगा) व गंगाधर मुढे रा. दिल्ली, अशा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीस पठाण यास अटक केली. त्यानंतर काल संजय जाधव यास अटक केली. या प्रकरणात उर्वरीत दोन आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे, असे सांगण्यात येते. या तपासादरम्यान या प्रकरणात आणखी कोणी संशयीत सहभागी आहेत का? या छडा लागणार आहे. दरम्यान, वरील गुन्हेगाराशी संपर्कात असणारे, त्यांच्याशी व्यवहार करणारे अन्य काही जण संशयीत असू शकतात. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु असल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR