लातूर : विनोद उगिले
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफु टी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात लातूर तालुक्यातील कातपूर शाळेत मुख्याद्यापक असलेल्या व तेंव्हापासून पोलीस व न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेल्या संशयीत आरोपी जलीलखाँ उमरखॉ पठाण यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने जामीन मंजूर केला आहे. तर सीबीआय व पोलीसांना अजुन ही या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार इरन्ना कोनगुलवार याचा सुगावा लागलेला नाह. तो गेल्या सात महिन्यांपासून फरार आहे. तर न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेला एन. गंगाधरप्पा व संजय जाधव यांनी हि जामीनासाठी धावपळ सुरु केली आहे.
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहचल्याने देशभरात चर्चेला आले होते. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार संजय जाधव व जलीलखॉ पठाण या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर मुंढे नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चार संशयीत आरोपी पैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले होते. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला सध्या लातूर शहरात वासत्व्यास असलेला व मुळ रा. देगलूर, जि. नांदेडचा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार हा आपल्या कुटूंबासह फरार झाला होत. तो अद्याप ही फरारच असून त्याला गजाआड करण्यात पोलीस व सीबीआयला मात्र अपयश आले असून याबद्दल नागरिकांतून उलटसुलट प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान सदरील प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले व या नंतर जवळपास महिनाभर सीबीआयच्या पथकाने लातूरात मुक्काम ठोकून या प्रकरणाचा कसून तपास केला व दरम्यानच्या काळात एन. गंगाधरप्पा यास अटक करून याप्रकरणी सीबीआय कोठडीतील संजय जाधव व जलीलखॉ पटाण व एन. गंगाधरप्पा यांची समोरासमोर चौकशी करून या प्रकरणी दोषारोप पत्र लातूर न्यायालयात सादर केले. तेंव्हा पासून हे तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीची हवा खात होते.
असे असतानाच या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या जलीलखॉ उमरखॉ पठाण याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जामीनासाठी याचीका क्र.१९००/२०२४ अनव्ये अर्ज सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाणे सदरील जामीन अर्ज मंजूर करत वैयक्तिक २५ हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून तो आता न्यायालयीन कोठडीतून बाहेर आला आहे. तर न्यायालयीन कोठडीतील संजय जाधव व एन. गंगाधरप्पा यांनी ही आता जामीनासाठी धावपळ सुरू केली आहे.