24.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरनीट प्रकरणी सीबीआय लातूरात

नीट प्रकरणी सीबीआय लातूरात

लातूर : प्रतिनिधी
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट २०२४ पेपरफु टी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत पोहचल्याने लातूरचे नाव देशभरात चर्चेला आले आहे. नीट पेपरफु टी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून अखेर याप्रकरणी सीबीआय अ‍ॅकश्न मोडवर आली आहे. शनिवारी रात्रीच सीबीआयचे दिल्ली येथून एक पथक व्हाया मुंबई मार्गे लातूरात दाखल झाले. रविवारी दिवसभर हे पथक लातूरात ठाण मांडून होते. त्यांच्याकडून रविवारी तपास हस्तांतराची व चौकशीची प्रकिया सुरू होती असे समजते.

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट प्रकरणी मागच्या आठवड्यात लातूरात शनिवारी दाखल झालेल्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिटने येथील संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण या दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची या प्रकरणी चौकशी करून सोडून दिले होते. मात्र रविवारी रात्री उशिरा याच लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर मुंढे नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चार संशयीत आरोपी पैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले असून ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला सध्या लातूर शहरात वासत्व्यास असलेला व मुळ रा. देगलूर, जि. नांदेडचा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक असलेला ईरन्ना मष्णाजी कोनगलवार हा आपल्या कुटूंबासह फरार आहे. तर दिल्लीच्या गंगाधर नामक आरोपीला सीबीआयने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

असे असतानाच मागच्या दोन दिवसापासून हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचे व या कामी सीबीआयचे एक पथक लातूरात शनिवारी दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहीती होती. याची प्रतिक्षा ही लागून राहीली होती. शनिवारी दिवसभर दाखल न झालेले सीबीआय पथक मात्र शनिवारीच दिल्लीहून व्ह्या मुंबई मार्गे बायकार लातूरात दाखल झाले. या पथकाने शनिवारी रात्री लातूरात रात्री मुक्कामानंतर सकाळी अ‍ॅकश्न मोड घेतला. सकाळी साडे अकराच्या सुमारास या तीन जणांचा त्यात दोन आयपीएस दर्जाचे अधकारी यांचा समावेश असलेल्या पथकाने यागुन्ह्याचा तपास करणारे लातूर शहर उपअधिक्षक भागवत फु ंदे यांचे गांधी चौक कार्यलय येथे दाखल होत.

तपास हस्तातंराची प्रक्रीयेला सुरूवात केली. या दरम्यान लातूर शहर उपअधिक्षक भागवत फु ंदे यांच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व गुन्हा दाखल असलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांची रेलचेल सुरू होती तर सकाळीच लातूर शहर उपअधिक्षक भागवत फु ंदे यांच्या कार्यालयात अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवंरे यांनी ही भेट दिल्याचे तसेच या पथकाने तपासाची सुत्रे हाती घेत तपासला सुरूवात ही केल्याचे व रात्री उशिरा पर्यंत ते याकामी व्यस्त असल्याचे समजतेण

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR