27 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeलातूरनुकसान ८० टक्के पीक विमा १७ हजार कसा?

नुकसान ८० टक्के पीक विमा १७ हजार कसा?

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांचे वन टाइम पूर्ण नुकसान झालेला आहे, त्यामुळे शेतक-यांना वन टाइम पूर्ण पीक विमा १०० टक्के मिळायला पाहिजे आणि १०० टक्के पीक विमा जर मिळाला तर शेतक-यांना हेक्टरी ५८ हजार रुपये मिळायला पाहिजे. पण सरकार म्हणतोय १७ हजार देऊ.. म्हणजे पीक विम्यामध्ये शेतक-यांचे ४१ हजार रुपये सरकार खातयं आणि शेतक-यांना मदत वाढून दिली म्हणत आहे. खरे तर सरकार शेतक-यांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे लातूर जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड मोठे नूकसान झाले आहे. तब्बल ५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांना अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे. उद्धवस्त झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली. त्याअनुषंगाने सत्तार पटेल निवेदनाद्वारे सरकार शेतक-यांची दिशाभूल करीत असून सरकार शेतक-यांना मदत म्हणत असले तरी ती ख-या अर्थाने शेतक-यांची थट्टाच होत  आहे, असेही ते म्हणाले. शेतक-यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिले होते. निवडणुक झाल्यानंतर योग्य वेळ आल्यावर शेतक-यांचे संपूणर््ा कर्जमाफ करण्यात येईल, असे सांगीतले होते. अतिवृष्टी आणि पुराने शेतक-यांचे सर्वच हिरावून गेले. आणखी या पेक्षा योग्य वेळ कोणती येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानूसार शेतीच शिल्लक राहिली नाही पाहिजे, तेव्हा संपूर्ण कर्जमुक्त करणार आहात काय?, असा प्रश्नही सत्तार पटेल यांनी उपस्थित केला.
सरकारने ८५०० रुपयांची मदत १८५०० रुपये केली. पण ही मदत साधारण ८० टक्के ते ८५ टक्केच मिळणार म्हणजेच १४८०० ते १५७२५ रुपये एवढीच मिळणार आहे. तेदेखील २ टप्प्यात. नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनींना हेक्टरी मिळणार ४७ हजार रुपये मिळणार. पण ते कसे पाहा… नदीच्या काठावर शेतक-याची दोन एकर शेती आहे, म्हणून शेतक-याला पूर्ण दोन एकर शेतीला ते पैसे मिळणार नाहीत तर त्या ठिकाणावरची मोजणी तलाठी करणार आणि साधारण ५ गुंठे जमीन खरडून गेलेली भरली तर एक गुंठा ४७० रुपये प्रमाणे २३५० रुपये मिळणार. आता विचार करा ५ गुंठे खरडून गेलेली जमीन २३५० रुपयांमध्ये भरून निघते का? आणि राहिला विषय मनरेगामधून ३५०००० मिळणार हे पण पैसे गुंठेवारीनेच मिळणार, मोजणी होणार गुंठा ३५०० प्रमाणे  मिळणार. मनरेगा ही योजना आहे आणि योजना मंजूर करायला किती चकरा मारावे लागतात. कोणा कोणाला किती पैसे द्यावे लागतात हे शेतक-यांना आणि सर्वांना चांगलं माहिती आहे.
आता समजा एखाद्या शेतक-याची दोन एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमधून एक-दोन गुंठ्याचा शेतीच्या आत मधातून जर नाला पडून खरडून गेला असेल त्या शेतक-यांची नुकसान भरपाई या रकमेतून कशी काढायची. कारण मोजणी जर केली तर ती फक्त एक, दोन गुंठे भरेल आणि एक, दोन गुंठ्याला पैसे किती आहेत.  आता सध्या ४७० प्रमाणे ९४० रुपये आणि नंतर मनरेगा मधून ३५०० प्रमाणे दोन गुंठ्याचे ७०००. आता विचार करा नुकसान भरून निघेल का ही शेतक-यांना मदत आहे का चेष्टा. सरकार मदतीच्या नावाखाली शेतक-यांची चेष्टा करीत असून मोठ्या प्रमाणात नूकसान होऊनही सरकारने अद्यापही ओला दुष्काळ जाहीर केलेला  नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR