27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रनोटांचे स्क्रॅप भरून जाणा-या ट्रकला आग

नोटांचे स्क्रॅप भरून जाणा-या ट्रकला आग

वर्धा : प्रतिनिधी
भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप भरून मुजफ्फरनगर येथे जात असलेल्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकमधील नोटांचे स्क्रॅप पूर्णत: जळून खाक झाले असून महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

ट्रकचालक जसवंत सिंग (वय ४५) आणि सहचालक भोपाळ दाताराम (वय ६०) हे दोघे ट्रकमध्ये भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप भरून हैदराबाद ते मुजफ्फरनगर येथे जात होते.

दरम्यान कांढळी ते बरबडी रस्त्यावर कांढळी शिवारात ट्रकमध्ये स्पार्किंग झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. दरम्यान ट्रकमधील नोटांचे स्क्रॅप जळून खाक झाले. याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमनच्या सहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR