लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त पदाधिका-यांना माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्त नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार धिरज देशमुख यांनी न्याय, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचा लढा असल्याचे नमुद केले.
या कार्यक्रमास माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य धनंजय देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, इंदिरा सुतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून तो जनतेच्या विश्वासाची आणि संघर्षाची परंपरा आहे.
सत्ता असो वा नसो, काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमीच सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांसाठी लढत राहिले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजपर्यंत देश घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य काँग्रेस पक्षाने केले असून, विकास, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि ग्रामीण भारताच्या बळकटीकरणासाठी काँग्रेसने सातत्याने योगदान दिले आहे. त्यामुळेच आजही सामान्य जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षावर कायम आहे. यावेळी प्रताप पाटील, गोवींद कदम, रमेश देशमुख, नवनाथ काळे,सचिन दाताळ,रामानंद जाधव,बादल शेख,परमेश्वर पाटील,कैलास पाटील, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रघुनाथ शिंदे यांनी केले.

