38.4 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeराष्ट्रीयन्या. यशवंत वर्मा यांच्या बदलीचा मार्ग मोकळा

न्या. यशवंत वर्मा यांच्या बदलीचा मार्ग मोकळा

केंद्र सरकारने दिली मान्यता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची रोख रकमेच्या गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्या मूळ अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यास सरकारने शुक्रवारी मान्यता दिली. त्यांना उत्तर प्रदेश उच्च न्यायालयात पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले.

न्यायमूर्ती वर्मा यांच्या प्रकरणाचा आढावा घेत असून एक-दोन दिवसांत त्यांच्या बदलीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सरकारने म्हटले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या दिल्ली उच्च न्यायालयाचे दुसरे न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रधारी सिंग यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याच्या शिफारसीलाही मान्यता दिली. जी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश होता. या कॉलेजिअमने न्यायमूर्ती सिंह यांना त्यांच्या मूळ न्यायालयात परत पाठवण्याची शिफारस केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR