छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
गॅस व्यावसायिकासोबत असलेल्या जुन्या वादातून एका टोळीने रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. यावेळी रिक्षाचालकाची मुले देखील सोबत होती. ही घटना पाहून मुलगा भेदरला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातल्या उड्डाणपुलाखाली सदरची घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिस दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. गॅस व्यवसायाच्या जुन्या वादातून एका टोळीने रिक्षाचालक इम्रान सय्यद शफिक सय्यद याची भर रस्त्यावर क्रूर हत्या केली. इम्रान मुलांसह त्याच्या रिक्षाने घरी जात होता. याच वेळी कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या मुलांसमोरच हाताची बोटे, मान कापून इम्रान सय्यद याची हत्या केली आहे.
मे महिन्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीतून मुजीब डॉन नामक गुन्हेगाराने ही हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सादातनगरमध्ये राहणारा इम्रान काल रात्री सायंकाळी त्याच्या चार आणि दहा वर्षाच्या मुलांना घेऊन बाहेर गेला होता. तो घरी परतत असताना उड्डाणपुलाखाली सिल्क मिल कॉलनी परिसरात अचानक सुसाट कारने त्याची रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा जणांनी उतरून इम्रानच्या मुलांना रिक्षाबाहेर काढले. त्यानंतर सीटवर बसलेल्या इम्रानवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
यावेळी इम्रानने शस्त्र पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्याच्या उजव्या हाताचे मनगट कापून मान व डोक्यावर वार केले. यात मोठा रक्तस्त्राव होऊन इम्रान जागीच मृत्युमुखी पडला. चालकावरच हल्ला झाल्याने रिक्षाच्या समोरील काचेवर रक्त उडाले. दरम्यान सोबत असलेल्या इम्रानच्या मुलांच्या डोळ्यादेखत हे सर्व भयानक कृत्य घडत असताना ते भेदरून गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला