22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे-नितेश राणेंनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

पंकजा मुंडे-नितेश राणेंनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी पंकजा मुंडे आणि नितेश राणे कुटुंबीयांची शिर्डीतील देवस्थानाच्या ठिकाणी भेट झाली. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांची आस्थेने चौकशी केल्याचे दिसून आले. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत खासदार सुजय विखे यांच्या आई शालिनी विखे पाटील देखील होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे आणि नितेश राणेंनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

भाजप नेत्या पंकजा मुंडे आज साई दरबारी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या आई सोबत होत्या. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या देखील पंकजा मुंडे यांच्यासोबत होत्या. त्याचवेळी भाजपचे आमदार नितेश राणे हे माध्यमांशी संवाद साधत होते. पंकजा मुंडेंनी राणे कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. नितेश राणे यांचा मुलगादेखील त्याठिकाणी होता. पंकजा मुंडे यांचा ज्यावेळी अपघात झाला होता आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यावेळी त्याच रुग्णालयात नितेश राणेंच्या मुलाचा जन्म झाला होता. तो किस्सा पंकजा मुंडे यांनी नितेश राणेंच्या मुलाला सांगितला.

माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या संदेशाचे पालन केले तर जीवनात अडचणी येत नाहीत. आज मी आईबरोबर या ठिकाणी आले. २०१४ नंतर प्रथमच आईच्या आग्रहामुळे देवदर्शन करण्यासाठी बाहेर पडले. गेली सत्तर दिवस प्रचारात गेले. कोणतंही काम स्वीकारलं तर शंभर टक्के द्यावंच लागतं. साईंच्या कृपेने निकाल देखील सकारात्मक येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR