27.8 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeक्रीडापंजाब किंग्ज विजयी

पंजाब किंग्ज विजयी

लखनौचा ३७ धावांनी पराभव
धर्मशाला : वृत्तसंस्था
आयपीएलमधील ५४ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर ३७ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा हा या मोसमातील एकूण सातवा तर लखनौ विरुद्धचा दुसरा विजय ठरला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईला पछाडत दुस-या स्थानी झेप घेतली आहे.
धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आज झालेल्या सामन्यात पंजाबने लखनौसमोर विजयासाठी २३७ धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. मात्र, लखनौला प्रत्युत्तरात २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १९९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे पंजाबचा विजय झाला. लखनौविरुद्ध पंजाबचा हा दुसरा विजय ठरला. पंजाबने याआधी १ एप्रिलला लखनौवर ८ विकेट्सने विजय मिळवला होता.

लखनौच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची निराशा केली. मिचेल मार्शला भोपळाही फोडता आला नाही. एडन मारक्रमने १३ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. निकोलस पूरननेही अवघ्या ६ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत या सामन्यातही अपयशी ठरला. पंत १८ रन्सवर आऊट झाला. डेव्हिड मिलरने ११ रन्स केल्या. त्यानंतर आयुष बदोनी आणि अब्दुल समद या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८१ रन्सची पार्टनरशीप केली. त्यानतंर अब्दुल समद आऊट झाला. त्याने २४ बॉलमध्ये ४५ रन्स केल्या. समद आऊट होताच लखनौच्या विजयाची शक्यता कमी झाली. समदनंतर आयुष बदोनीही माघारी परतला. बदोनीने लखनौसाठी ४० बॉलमध्ये ५ सिक्स आणि ५ फोरसह सर्वाधिक ७४ रन्स केल्या तर प्रिन्स यादव १ रनवर नॉट आऊट राहिला. पंजाबसाठी अर्शदीप सिंहने सर्वाधिक ३ विके्टस मिळवल्या. अझमतुल्लाह ओमरझई याने दोघांना आऊट केलं. तर मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR