16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeसोलापूरपंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे सामूहिक आरती     

पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे सामूहिक आरती     

 पंढरपूर – मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला  मंदिर तेथे सामूहिक आरती  करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे  महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे त एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्याप्रमाणे  पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी  सामूहिक आरती  मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती  मंदिर महासंघा चे सदस्य  विनोद रसाळ यांनी दिली आहे.
या वेळी पंढरपूर येथील वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, तसेच ह.भ.प. शाम महाराज उखळीकर,  ह.भ.प. चवरे महाराज, ह.भ.प. रघु महाराज कबीर, ह.भ.प. नागेश महाराज बागडे, ह.भ.प. दर्शन महाराज बडवे, ह.भ.प. बाबाराव बडवे महाराज, महेश खिस्ते, सौरभ थिटे, वैभव बडवे,
बाळासाहेब डिंगरे, महेशाचार्य उत्पात, विठ्ठल बडवे, हरी काका कुलकर्णी, रवी काका क्षीरसागर, श्रीराम बडवे, सचिन लादे, इस्कॉनचे नागेश दास, दिलीप बडवे, मयूर बडवे, उदय इंदापूरकर, अधिवक्ता आशुतोष बडवे, रामेश्वर कोरे, महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्य कोर ग्रुप सदस्य . गणेश लंके, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे  विनोद रसाळ,  हिंदु जनजागृती समितीचे    राजन बुणगे  यांच्यासह मोठ्या संख्येने विविध मंदिरांचे विश्वस्त, वारकरी मंडळी आणि भाविक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR