19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरीत तब्बल पाचशेच्या २०२९ बनावट नोटा जप्त

पंढरीत तब्बल पाचशेच्या २०२९ बनावट नोटा जप्त

१० लाख १४ हजार बनावट नोटांसह २ एजंट जाळ््यात

पंढरपूर /प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका संपताच पंढरपूरमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल १० लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

येथील मधुकर माने यांना एजंटकडून गाई-गोठ्यांचे १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. ५०० रूपयांच्या नोटा घेऊन माने बँकेत गेले. त्यावेळी त्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना अटक केली. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का, हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल. पण इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा मिळाल्यामुळे पंढरपूर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर पोलिसांनी तब्बल १० लाख १४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणी राजू चोरमले आणि अतुल तावरे या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने बनावट नोटांचा पर्दाफाश केला आहे. मधुकर माने यांना बनावट नोटा देत, आरोपींनी गंडा घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात शासकीय योजना मंजूर करून देणारे खासगी एजंट राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी तक्रारदार मधुकर माने यांनी सांगितले की, आरोपींनी गाई गोठ्याचे अनुदान मंजूर झाले म्हणून १० लाख १४ हजार ५०० रूपये दिले होते. यामध्ये ५०० रुपयांच्या २०२९ नोटांचा समावेश होता.’ ही रक्कम घेऊन तक्रारदार बँकेत पोहोचला. त्यावेळी सर्व नोटा बनावट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या नोटा बनावट असल्याचे समजताच माने यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेतली. माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आणि घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन जणांना अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR