16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी विरोधी पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये केले ‘जवाब दो’आंदोलन

पंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी विरोधी पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये केले ‘जवाब दो’आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित जळगाव दौरा होता. यासाठी ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचले आणि तेथून हेलिकॉप्टरने जळगावला रवाणा झाले. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी आज सकाळी महाविकास आघाडी च्या वतीने विमानतळ परिसरातच ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

विमानतळाच्या बाजूला असलेल्या मातोश्री लोन जवळ अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करणा-या आंदोलकांनी कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणाची डॉक्टरवर सामूहिक अत्याचार , नाशिकमध्ये झालेल्या अत्याचाराच्या तीन घटना, बदलापूर अत्याचाराचा घटनेचा निषेध नोंदवणारे फलक घेऊन मोदीजी जवाब दो म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मविआचे कार्यकर्ते जमले होते. विषेश करून महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. तोंडाला आणि हाताला काळया पट्ट्या बांधून आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते.

पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी दांडगा पोलिस बंदोबस्त

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव दौ-यावर जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येणार आहेत याची माहिती पोलिसांना असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विमानतळावर दांडगा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, मोदी जवाब दो या महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजू वैद्य माजी महापौर नंदकुमार घोडेले विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर डांगे मनोज गांगवे,काँग्रेस शहराध्यक्ष युसुफ शेख, भाऊसाहेब जगताप,राहुल सावंत, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR