हावडा : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या पतीची किडनी १० लाख रुपयांना विकत सर्व पैसे घेऊन ती प्रियकरासह पळून गेली.
पोलिसांनी सांगितले की, महिलेने तिच्या पतीला तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमा करण्यास सांगितले. आणि १० लाख रुपयांना किडनी विकण्यास भाग पाडले. संकरेल येथील रहिवासी असलेल्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पतीने फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी गेल्या एक वर्षापासून किडनी विकून पैसे मिळवण्यासाठी दबाव आणत होती. या पैशातून ती घर चांगल्या पद्धतीने चालवणार असून आपल्या १२ वर्षाच्या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देणार असल्याचे तिने सांगितले.
यानंतर त्याने किडनी विकण्याचे मान्य केले आणि खरेदीदाराशी करार केला. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर पतीने पैसे घरी आणले. त्याच्या पत्नीने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आणि लवकर बरे होण्यासाठी बाहेर पडू नये असे सांगितले. बराकपूरमध्ये आणखी एका पुरुषासोबत महिला दिसली यानंतर कुटुंबीयांनी मित्र आणि परिचितांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला. हावडापासून दूर कोलकात्याच्या उत्तर उपनगरातील बॅरकपूर येथील एका घरात ही महिला आढळून आली. ती ज्याच्यासोबत पळून गेली होती, तोही याच घरात राहत होता.
महिलेने सांगितले की, ती फेसबुकवर तिच्या प्रियकराला भेटली होती. दोघेही गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. पतीला घटस्फोट देणार, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप जेव्हा तिचा नवरा, सासू आणि मुलगी बॅरकपूरमधील व्यक्तीच्या घरी गेले तेव्हा तिने बाहेर येण्यास नकार दिला, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या प्रियकराने तिला सांगितले की ती त्याला घटस्फोट देईल, तिच्या सासरच्या मंडळींनी लग्नानंतर १६ वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला.