22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeलातूरपत्रकार, लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करावे

पत्रकार, लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करावे

चाकूर : प्रतिनिधी
समाजाच्या विकासासाठी पत्रकार आणि लोकप्रतिनिधिंनी हातात हात घालून काम करणे अतिशय महत्वाचे असून यासाठी दोघांनीही सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

चाकूर सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील विविध पुरस्काराचे वितरण राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हस्ते रविवार, दि १२ जानेवारी रोजी चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माहिती विभागाचे विभागीय सहाय्यक संचालक डॉ.श्याम टरके होते.

याप्रसंगी सत्कारमूर्ती तथा पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मातोश्री कमलनी अमृतराव डोंग्रजकर, कन्या शर्वरी मंगेशराव देशपांडे, टाईम्स नाऊ मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील, दैनिक मराठवाडा केसरीसह अनेक दैनिकांचे समूह संपादक नरसिंह घोणे आणि दैनिक गावकरीचे जिल्हा प्रतिनिधी संजीव पाटील हे मान्यंवर उपस्थित होते.यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सर्व सत्कारमूर्तीचा सन्मान्हचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद, जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे , राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, बाळू लाटे, गणपत कवठे, काँग्रेस शहराध्यक्ष हुसेन शेख, व्ही. एस. पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, ज्ञानेश्वर चाकूरकर, अ‍ॅड. संतोष गंभीरे, अ‍ॅड. संतोष माने, अ‍ॅड. श्रीधर सोनटक्के, विश्वनाथ एडके, विष्णू तिकटे, मोहन कुलकर्णी, संतोष फुलारी, पत्रकार प्रशांत शेटे, संग्राम वाघमारे, सुधाकर हेमनर, गणेश स्वामी, अलीम शेख, अजगर मचकुरी, हाकाणी सौदागर, संदीप शेटे, युनूस सय्यद, प्रा.रमेश शिंदे, तौफिक शेख, अजित सौदागर, मतीन गुळवे, चंद्रमणी सिरसाठ जाफर सय्यद, माजी सैनिक शिवाजी शिंदे, इंजि.शिरीष शिंदे, सचिन तोरे यांच्यासह चाकूर तालूक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश तगडपल्लेवार यांनी केले.सीटी प्रेस क्लब चाकूरचे अध्यक्ष प्रा.अ. ना. शिंदे यांनी प्रास्तावीक मनोगत व्यक्त केले.सचिव मधुकर कांबळे यांनी उपस्थिंताचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमेश्वर जनगावे, सतिश गाडेकर, सलीम तांबोळी, चेतन होळदांडगे, सुनील भोसले,अ‍ॅड. बसवेश्वर जनगावे, उद्धव दुवे, विजय शिंदे, सुशील वाघमारे यांनी पुढाकार घेतला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR