लातूर : प्रतिनिधी
पद्मभूषण जगद्वविख्यात संगणक शास्त्रज्ञ तथा नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. विजय भटकर यांनी लातूरच्या औसा रोड येथील श्री सदानंद दत्त मठास दि. ८ मे रोजी भेट देऊन गुरुदत्तांचे दर्शन घेतले मनोभावे सेवा केली यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील औसा रोडवरील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्रीसदानंद दत्त मठ अनेक वर्षापासून आहे या ठिकाणी लातूर व परिसरातून भाविक दर्शनाला येतात. यावेळी डॉ. विजय भटकर यांनी मंदिराचे विश्वस्त प्रमुख अमृत पाटील यांच्याशी संवाद साधला. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे येथील एम.आय.टी डब्ल्यू पियुचे कुलगुरु डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.