22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वलच

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वलच

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधकांनी परकीय गुंतवणूक घटल्याचा आरोप केला. मात्र, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परकीय गुंतवणूक वाढली असल्याचा दावा केला आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असे फडणवीस म्हणाले. तशी आकडेवरीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे.

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुस-या वर्षी क्रमांक १ वर राहिला आहे. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये क्रमांक १ वर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षांतसुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली, असे फडणवीस म्हणाले.

२०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी तर २०२३-२४ या आर्थिक वर्षांत १,२५,१०१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. या दोन्ही आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे तर दुस-या क्रमांकावरील गुजरात आणि तिस-या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असे गणित फडणवीस यांनी मांडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR