परभणी : अखिल भारतीय पेशवा संघटने मार्फत परभणी शहरातील गंगा मंगल कार्यालयात दि.२६ जानेवारी रोजी येथे सर्व शाखीय मोफत राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर परीचय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास जवळपास ६०० बृह्मवृंदाची उपस्थिती होती. या मेळाव्यात जवळपास ३५० उपवर- वधू यांनी नाव नोंदणी केली.
अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून बंडू नाना सराफ, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद धानोरकर, उदघाटक डॉ .राहुल आंबेकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी निखिल लातूरकर, अॅड. किरण सुभेदार, लक्ष्मीकांत दडके, श्याम कुलकर्णी, हेमंत उन्हाळे, विजय पिंगळे, संतोष जोशी, संतोष कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
परभणी जिल्हा अध्यक्ष दिपक कासांडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात अॅड. सुनीता जोशी (देशपांडे), भास्करराव देशपांडे, अभय जोशी, अनंतराव देशपांडे, संतोष जोशी, अलका जोशी यांच्यासह परभणी, परळी वैजनाथ, नांदेड, हैद्राबाद, पाथरी, गंगाखेड, धारूर केज,अंबाजोगाईसह इतर गावातील ब्रम्हवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.