16.9 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeपरभणीपरभणी जिल्हा महिला रूग्णालय राज्यात दुसरे

परभणी जिल्हा महिला रूग्णालय राज्यात दुसरे

परभणी : राज्यातील जिल्हा महिला रूग्णालयातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी दरमहा आरोग्य निर्देशांक निश्चित करण्यात येत असतात. या निर्देशांकानुसार मुंबई आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून दरमहा रँकींग देण्यात येते. या रँकींगमध्ये ऑक्टोंबर महिन्यात परभणी जिल्हा महिला रूग्णालयाने (१०० खाटा) ८२ गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

राज्यातील आरोग्य सेवांच्या अद्यावत परीस्थितीचे आकलन व्हावे यासाठी जिल्हा महिला रूग्णालय (१०० खाटा) यांना दरमहा रँकींग देण्यात येते. मुंबई आरोग्य सेवा आयुक्तालय संचालक यांच्याकडून जुन २०२४ पासून रँकींग करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याची रँकींग जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अकोला महिला रूग्णालयाने ९५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अमरावती व परभणी महिला रूग्णालयाने ८२ गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. लातूर महिला रूग्णालय चौथ्या तर जालना महिला रूग्णालय ५व्या क्रमांकावर आहे.

उपरोक्त रँकींगनुसार राज्यात शेवटच्या ५ महिला रूग्णालयात (१०० खाटा) नेकनूर, कुडाळ, मालेगाव, यवतमाळ, धुळे या महिला रूग्णालयांचा समावेश आहे. ही रूग्णालये अनुक्रमे १६, १७, १८, १९ व २०व्या क्रमांकावर आहेत. या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम अंमलबजावणीकडे लक्ष देवून सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच रूग्ण सेवा, साहित्य, गुणवत्ता, प्रसुती सुविधा, बालकांचे आरोग्य या कार्यक्रमामध्ये वरील रूग्णालयाचे काम असमाधानकारक असून त्यात सुधारणा होण्यासाठी कार्यवाही करण्यात याव्या अशा सुचना पुणे आरोग्य आरोग्य सेवा संचालक यांनी दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR