15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरपरळीमध्ये पहिल्यांदाच ‘कमळ’विना निवडणूक

परळीमध्ये पहिल्यांदाच ‘कमळ’विना निवडणूक

बीड : विशेष प्रतिनिधी
परळी मतदारसंघात भाजपचे वर्चस्व गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून अबाधित होते. स्वत: गोपीनाथ मुंडेंनी याच मतदारसंघातून आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढली आणि ज्ािंकली. त्यानंतर, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी त्यांचा राजकीय वारसा चालवला.

पहिल्यांदाच २०१९ मध्ये भाजपचे ‘कमळ’ येथील मतदारसंघात पराभूत झाले. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथे कमळाचे चिन्हच असणार नाही. त्यावरुन, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला. भाजपला परळी मतदारसंघात प्रचार करण्याचा नैतिक अधिकारच उरला नाही. कारण, ज्या गोपीनाथ मुंडेंनी ४५ वर्षांपूर्वी कमळ खुलवलं, त्या परळीत यंदा कमळाचं चिन्हच नसणार असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात ४० वर्षानंतर पहिल्यांदाच या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह नसणार आहे. कारण, धनंजय मुंडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढविणार आहेत. महायुतीमध्ये सहयोगी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी लढवत असल्याने भाजपचा या ठिकाणी उमेदवार नसणार आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ४० वर्षात पहिल्यांदाच कमळाविना मतदान करावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR