मुंबई : वृत्तसंस्था
कियारा अडवाणी, अथिया शेट्टी, मालविका राज यांच्यानंतर बॉलिवूडमधून अजून एक गुडन्यूज आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत परिणीतीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या घरी पाळणार हलणार आहे. परिणीती आणि राघव चड्ढा लवकरच आईबाबा होणार आहेत.
परिणीतीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चिमुकल्याच्या पायांचे ठसे दिसत आहेत. ‘१+१ = ३’ असे त्या फोटोमध्ये दिसत आहे. आमचे छोटे युनिव्हर्स लवकरच येत आहे, असे कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. परिणीतीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. राघव चड्ढा हे राजकारणात सक्रीय असून आम आदमी पक्षाचे ते खासदार आहेत.