22.2 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeराष्ट्रीयपरीक्षेचे टेन्शन नकोच

परीक्षेचे टेन्शन नकोच

ज्या विषयाची भीती त्याची आधी तयारी करा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला

नवी दिल्ली : सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली आहे. पेपर कसे जातील याची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन घेतानाही दिसत आहेत. आज देशभरातील या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. तुम्ही परीक्षेचे टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका. तुम्ही काय करू शकता हे पाहा असे सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते, त्या विषयाची आधी तयारी करा असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेही मोदींनी त्यांच्याशी भाष्य केले. हा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला.

नेतृत्व गुण विकसित करा
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र देतानाच नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे सुद्धा सांगितलं. लीडरला टीम वर्क शिकणं महत्त्वाचं आहे. कुणाला काम दिलं असेल तर त्यातील अडचणी समजून घेतल्या पाहिजे. जिथे कमी, तिथे आम्ही हा सिद्धांत तुम्ही मनात बिंबवून ठेवा. लोकांचा विश्वासच तुमच्या लीडरशीपला मान्यता देईल, असं मोदी म्हणाले.

आव्हानांचा सामना करा
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचाही कानमंत्र दिला. तुम्हाला तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा लागेल. मागच्यावेळी तुम्हाला ३० मार्क होते, तर तुम्हाला यावेळी ३५ मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे करून तुम्ही तुमचे टार्गेट वाढवले पाहिजे. हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढले पाहिजे असे मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR