18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरपरेड सोहळ्याचे निमंत्रण बेलूरच्या सरपंचांना

परेड सोहळ्याचे निमंत्रण बेलूरच्या सरपंचांना

अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील बेलूर येथील उपक्रमशील सरपंच सौ कमलबाई राजपाल सूर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने येत्या २६ जानेवारीला दिल्ली येथील  होणा-या दिमाखदार परेड सोहळ्याचे  निमंत्रण दिले असून अहमदपूर तालुक्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब असून या निवडीबाबत अनेक स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे
ग्रामपंचायत मध्ये काम करीत असताना ग्रामविकासाची कास धरून आपली ग्रामपंचायत मॉडेल ठरवलेल्या राज्यातील फक्त ११ ग्रामपंचायत सरपंच यांना दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एकमेव बेलूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कमलबाई राजपाल सूर्यवंशी व ग्रामसेविका सौ शीतल अकनगिरे यांचा समावेश असून ही अभिनंदनीय आणि अभिमानास्पद बाब आहे.
   २६ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. याची सद्या जोरदार तयारी सुरू असतानाच अहमदपूर तालुक्यातील बेलूर गावच्या शिरपेचात हा एक नवीन मानाचा तुरा रोवणा-या बातमीने आनंद व्यक्त केला जात आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी व अहमदपूरचे गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बेलूर ग्रामपंचायतने आर.आर.आबा सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यातून  प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल बेलूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR