30.9 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्रपर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो

‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी

पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘केसरी टूर्स’चे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्योजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली.

‘केसरी टूर्स’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहोचवली. या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत.

त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या, केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR