32.8 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रपवार-महाजन यांच्यात खडाजंगी

पवार-महाजन यांच्यात खडाजंगी

निधीसाठी जमिनी विकायच्या का, पवार यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी
कॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. त्यावर निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का, असा सवाल अजित पवारांनी विचारला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. आपल्या खात्याला अधिकचा निधी देण्यात यावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली. त्यावर निधी कुठून आणायचा, आता काय जमिनी विकायच्या का, असा सवाल अजित पवारांनी विचारल्याची माहिती आहे.
त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली, असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला. त्यावरून अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे.
एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चांवरून चलबिचल सुरू असताना आता नेत्यांमध्येही सर्वकाही आलबेल नाही हे दिसून येत आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेची तयारी सुरू झाली असून महायुतीने सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. पण निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांआधीच महायुतीमध्ये वाद समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR