28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमुख्य बातम्यापशुपतीनाथला १० लाख भाविक जाणार

पशुपतीनाथला १० लाख भाविक जाणार

काठमांडू : महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी नेपाळ आणि भारतातील जवळपास दहा लाख भाविक येथील पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता आहे. बागमती नदीच्या काठावर असलेल्या पाचव्या शतकातील मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जवळपास ४,००० साधू आणि हजारो भाविक काठमांडूमध्ये येतील. महाशिवरात्रीला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एकूण १०,००० सुरक्षा कर्मचारी आणि ५,००० स्वयंसेवक तैनात केले जातील. तसेच, महाशिवरात्रीला पशुपतिनाथ मंदिर पहाटे २.१५ वाजता उघडेल आणि भाविकांना मंदिराच्या चारही दरवाज्यांमधून शिवलिंगाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रेवती अधिकारी यांनी दिली. सोमवार ते गुरुवार पशुपतिनाथ मंदिर परिसरात आणि आसपास दारू, मांस आणि मासे प्रतिबंधित असतील. तसेच, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR