22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeलातूरपशू दवाखान्याची भिस्त परिचारकावर

पशू दवाखान्याची भिस्त परिचारकावर

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखाना कंपाउंडरवर चालत असल्याने पशुधनांना योग्य उपचार मिळत नसल्याने एका शेतक-याने आचारसंहिता संपली निवडणूक संपली आता तरी आमच्या पशूंना न्याय द्या साहेब असे बॅनर लावून प्रदर्शन केले व संबंधित बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने प्रशासन खडबडून जागे होऊन याबाबतची चौकशी करण्यासाठी अधिका-यांना पाठविण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालय असून येथे औराद शहरासह परिसरातील अनेक गावांचा जनावरांना उपचार केला जातो पण गेल्या काही दिवसापासून येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही अशी शेतक-यांची ओरड सुरू आहे दरम्यान येथील शेतकरी उमाकांत भंडारे यांनी अनेकदा प्रशासनाकडे रुग्णालयात जाऊन आपले जनावर दाखवली पण डॉक्टर उपचार न करता कंपाउंडर उपचार केले त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिका-याकडे याची तक्रारी केली पण कोणीच दखल न घेतल्याने अखेर त्यांनी मंगळवारी दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर बॅनर लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR