मालवण :
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मनोज जरांगेंनी एक शंका उपस्थित केली. वा-यामुळे पुतळा कोसळला. असं सरकार म्हणतंय. पण मग पश्चिमेकडून आलेल्या वा-यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला? अशी शंका मनोज जरांगे यांनी उपस्थित केली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
पश्चिमेकडून आलेल्या वा-यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला? यात राजकारण होऊ नये, याची सरकारने याची चौकशी केली पाहिजे. कायद्यामध्ये बदल केला पाहिजे आणि कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरला सोडलं गेलं नाही पाहिजे. तो आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे. सरकारचा महापुरुषांच्या स्मारकाबद्दल बारीक वॉच असला पाहिजे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बघतो आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शहाणे आहात. पण छत्रपतींच्या जीवावर कुणीही राजकारण करू नका, असे मनोज जरांगे म्हणाले.