24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयपश्चिम बंगालमधील दोन जागांवर फेर मतदान

पश्चिम बंगालमधील दोन जागांवर फेर मतदान

कोलकाता : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले. तर उद्या अर्थात ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. परंतु त्यापूर्वी पश्चिम बंगालमधील बारासात आणि मथुरापूर लोकसभा जागांसाठी प्रत्येकी एका बूथवर मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी येथे फेर मतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथे आज मतदान पार पडत आहे.

या जागांसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी झाले होते, मात्र अनियमिततेच्या तक्रारी आल्यानंतर या बूथवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत या बुथवर मतदान सुरू राहणार आहे. बारासातच्या देगंगा विधानसभा केंद्र आणि मथुरापूरच्या काकडद्वीप विधानसभा केंद्रावर असलेल्या बूथवर पुन्हा मतदान होत आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अहवालाच्या आधारे या बूथवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील नऊ जागांसाठी शनिवारी १ जून रोजी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू झाले होते. दमदम, बारासत, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या मतदारसंघात मतदान होते. यानंतर आता यातील दोन मतदार संघात पुन्हा मतदान होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या सातही टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी संपले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR