38.9 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्र‘पहलगाम’ घटना देशावरचा हल्ला: पवारांचे वक्तव्य

‘पहलगाम’ घटना देशावरचा हल्ला: पवारांचे वक्तव्य

ठाणे : प्रतिनिधी
पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावे लागेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ३० एप्रिल रोजी ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरात पवार यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले आहे. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांना पहलगामबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी उत्तर दिले.

देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जी उपाययोजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हीच भूमिका आमची आहे. पहलगाम प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच आहे. कारण पहलगाम प्रश्नी संपूर्ण देश एक आहे. कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन घेणे हे उपयुक्त ठरेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, दोन कुटुंबं एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज राजकारणावर काही भाष्य नको असे शरद पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांंनी या प्रश्नावर उत्तर दिले होते. तसंच पहलगामबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचे भाष्य केले.
पहलगामबाबत काय म्हणाले शरद पवार?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच जगाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR