36.4 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमुख्य बातम्यापहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी पॅरा कमांडोचा सहभाग उघड?

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी पॅरा कमांडोचा सहभाग उघड?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अली भाई आणि आदिल हुसेन थोकर यांच्यासह हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान यांची ओळख पटवण्यात आली. यातील दहशतवादी हाशिम मुसा याच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मुसाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे.

पहलगाममध्ये दहशत माजवणारा हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यातील पॅरा कमांडो असल्याचे समोर आलं आहे. हाशिम मुसा हा पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडर आहे. दहशतवादी कटाच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हाशिम मुसा सध्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या आदेशांवर काम करतो. तो एक कट्टर दहशतवादी आहे. लष्करमधल्या मास्टरमाईंडनेच हाशिमला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी काश्मीरला पाठवले होते. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ल्यासाठी काही दिवसांसाठी लष्कर-ए-तोयबाकडे सोपवल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

चौकशीदरम्यान हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहिती समोर आली. मुसा हा फक्त पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी नव्हता. ऑक्टोबर २०२४ मध्ये गंदरबल आणि बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागेही त्याचाच हात होता. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान पहलगाममधील १५ अतिरेकी कामगारांनी याच दहशतवाद्यांना गंदरबल हल्ल्यासाठी रसद पुरवली होती. त्यानंतर आता पहलगाममध्येही मुसाने २६ नागरिकांना मारले. पहलगामच्या इतर दहशतवाद्यांसह हाशिम मुसावर २० लाख रुपयांचे बक्षीस आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR